SHOP ACT LICENCES : ( शॉपऍक्ट लायसन्स )
शॉपऍक्ट लायसन्स काय असते?
ज्यांना नवीन दुकान, व्यावसायिक, सेवा प्रधान व्यवसाय महाराष्ट्रात उघडायचा आहे. त्यांना बॉम्बे शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, 1948. अंतर्गत स्वतःच्या व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक आहे. शहरीभागात व्यवसाय करताना., तुमचा व्यवसाय अधिकृत आहे याचे शॉपऍक्ट एक प्रमाणपत्र आहे. शॉपऍक्ट लायसन्सला गुमस्ता असेही म्हंटले जाते. तुमचा व्यवसाय कुठलाही असो., तुम्हाला शॉपऍक्ट लायसन्स काढणे आवश्यक आहे. उदारणार्थ,
- ब्युटीपार्लर.
- कोचिंग क्लासेस.
- कॉम्युटर ट्रेनींग इंस्टीट्यूट.
- चिट फंड कंपनी.
- हॉटेल.
- बेकरी.
- कटिंगचे दुकान.
- मोबाईल शॉपी.
- कॉम्युटरचे दुकान.
- भेळ पूरी.
- पिठाची गिरणी.
- शिलाई मशीन (टेलर).
- गृह उद्योग.
- इतर कुठलाही.
शॉपऍक्ट लायसन्सचा फायदा
- व्यवसाय चालविण्याचा कायदेशीर अधिकार शॉपऍक्ट लायसन्सने येतो.
- शॉपऍक्ट लायसन्स मिळाल्यावरच., तुम्ही बँकेत तुमच्या दुकानाच्या नावाने करंट अकाउंट उघडु शकता.
- एक दोन वर्ष तुम्ही जर त्या खात्यात व्यवहार (ट्रान्ज्याक्शन) चांगले केले.,
तर तुम्हाला त्याच खात्यावर सीसी लोन सुद्धा सहज मिळु शकते.,
ज्याच्या सहायाने तुम्हाला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. - कुठल्याही सरकारी स्कीमचा फायदा घेण्यासाठी आवश्यक.
- व्यवसाय लोन फाईलसाठी आवश्यक.
हे आहे शॉपऍक्ट लायसन्सचे फायदे.
तुमचा व्यवसाय छोटा असो वा मोठा., स्वतंत्र दुकान असो वा घरातूनच करता., ऑनलाईन करता वा ऑफलाईन., तुम्हाला शॉपऍक्ट लायसन्स काढता येथे., व तुम्ही काढलेच पाहिजे.
शॉपऍक्ट साठी काय काय कागदपत्र लागतात
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड फोटो.
- व्यवसायाच नाव.
- व्यवसाय कशाचा आहे.
- व्यवसायाचा पत्ता.
- मालकाचा पासपोर्ट साईझ फोटो.
- मोबाईल नंबर आणि इमेल आयडी.
- सहीचा फोटो.
- दुकानाचा फोटो.
- कामावर ठेवलेल्या लोकांची संख्या.
Scan Documents Required along with application for Shops and Establishment Registration ,Renewal, and Amendment
- Annexure -for premises of Establishment,
- Annexure A self declaration ( 75KB to 100KB) format given of left side of webpage
- Annexure B self declaration for attestation ( 75KB to 100KB) format given of left side of webpage
- Annexure C under taking ( 75KB to 100KB) format given of left side of webpage
- Photo (20KB to 30KB)
- Signature (9KB to 15KB)
- Proof of Identity of Applicant ( copy of Driving Licence, Passport, Aadhar Card, PAN Card) ( 75KB to 100KB)
8. Copy of Fee receipt paid earlier ( in case of Old user) ( 75KB to 100KB)