वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित ( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )

महामंडळाची स्‍थापना

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ, मर्यादित मुंबई या महामंडळाची दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली असून सदर महामंडळ सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या अधिनस्‍त कार्यरत होते. शासन अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्‍वये सामाजिक न्‍याय विभागातून इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या स्‍वतंत्र विभागची स्‍थापना करण्‍यात आली असून शासन निर्णय क्रमांक इमाव 2016/प्र.क्र.95/आस्थापना, दि.24 जुलै, 2019 नुसार इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग असे नामकरण करण्‍यात आले आहे. सदर विभागाच्‍या अधिनस्‍त वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ कार्यरत आहे.

महामंडळ स्थापनेची उद्दिष्टे

सदर महामंडळामार्फत विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्‍नतीकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्‍यात येते.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

अर्जदाराची अर्हता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
  • लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ५० दरम्यान असावे
  • अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

  • शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक स्टेटमेंट
  • प्रकल्प अहवाल

गट कर्ज व्याज परतावा योजना

अर्जदाराची अर्हता:

  • गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  • गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत.
  • गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील
  • गटातील लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ४५ दरम्यान असावे

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

  • शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक स्टेटमेंट
  • प्रकल्प अहवाल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top