अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

    •  महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सर्वेक्षण, कृती संशोधनासहित मूल्यमापन याद्वारे संशोधनात्मक अभ्यास करून त्यावर विविध कार्यक्रमांचे माध्यमातून उपाययोजना आखणे.
    • ⮚ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांच्या आत्मविश्वास वृद्धीसाठी संवाद-सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, इंग्रजीसहित इतर भाषांवर प्रभुत्व इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. लाभार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक स्तर उन्नतीसाठी उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य देणे.
  • ⮚ अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांच्या व्यावसायिक क्षमता वृद्धीसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, लघु व मध्यम उद्योग सुरू करणे, औद्योगिक व्यवसायांची स्थापना करण्यास प्रवृत करून वित्तीय संस्थांच्या समन्वयाने आर्थिक पाठबळ देवून स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहित करणे.
  • योजनेचा उद्देश:
    खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील जे उमेदवार स्वत:चा उद्योग / व्यवसाय सुरु करू इच्छितात

    योजनेचा लक्षगट:

      खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील जे उमेदवार स्वत:चा उद्योग / व्यवसाय सुरु करू इच्छितात

     

    लाभार्थी निवड निकष:

          1. 1.अर्जदार अमृत संस्थेच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करणारा असणे बंधनकारक.
          1. 2. अर्जदाराकडे उद्योग / व्यवसायासाठी आवश्यक सर्व वैध परवाने (Valid licenses), उद्यम आधार प्रमाणपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे.
          1. 3. उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याच्या प्रमाणपत्राची स्वस्वाक्षरीत प्रत जोडावी.
          1. 4. अर्जदाराचे उद्योग व्यवसायाच्या TAN/PAN कार्डची स्वस्वाक्षरीत (Self-attested) प्रत.
          1. 5. अर्जदाराचे बँक खाते आधार लिंक असणे अनिवार्य राहील.
          1. 6. अर्जदार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

     

    योजनेच्या इतर अटी व शर्ती :

          1. 1. अर्जदाराने कर्ज प्रकरण भारतीय रिझर्व्ह बँकेने उद्योग / व्यवसाय प्रयोजनासाठी कर्ज वितरणासाठी परवाना दिलेल्या राष्ट्रीयकृत बँका / सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती बँका / शेडयूल बँका / खाजगी बँका इ. वित्तीय संस्थां यांचेकडे करणे आवश्यक राहील.
          1. 2. या योजनांतर्गत लाभार्थ्याना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना / परशुराम गट व्याज परतावा योजना यापैकी केवळ एक योजनेचा लाभ घेता येईल.
          1. 3. लाभार्थ्याने नियमितपणे सव्याज कर्जफेड करणे आवश्यक, नियमित कर्जफेड होत नसल्यास व्याज परतावा दिला जाणार नाही.
          1. 4. अमृत संस्थेच्या आर्थिक विकासाकरीता स्वयंरोजगारास प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे व कृषी उत्पन्न आधारीत उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षण या दोन योजने मध्ये सहभाग घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल

    लाभाचे स्वरूप:

        1. 1. बँकेने दिलेल्या कर्जाच्या EMI Statement मधील वेळापत्रकानुसार लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेवर व नियमितपणे भरल्यास, कर्जावरील केवळ व्याजाची रक्कम (बँकेने आकारलेला व्याज दर अथवा योजनेतील उच्चतम अनुज्ञेय व्याज परतावा दर मर्यादा १२ टक्के, यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेत) लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक बचत खात्यात जमा केली जाईल.
        1. 2. लाभार्थ्याने बँकेकडून व्यवसाय / उद्योग यासाठी घेतलेल्या कर्जावरील केवळ व्याजाची रक्कम अनुज्ञेय उच्चतम मर्यादेत अमृत व्दारा लाभार्थ्याला अदा केली जाईल. त्या व्यतिरिक्त बँकेने इतर कोणेतेही जादा शुल्क, चार्जेस आकारल्यास लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top