राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.
राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभर्थ्यांना कोण कोणती कागदपत्रे जमा करावी लागतात ते खालील चार्ट मध्ये नमूद केले आहे.
तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र | Tahsildar Income certificate |
आधार कार्ड | Aadhar card |
पॅन कार्ड | Pan card |
शाळा सोडल्याचा दाखला | Leaving certificate |
रेशनकार्ड | Ration card |
प्रकल्प अहवाल अर्ज | Project Report Application |
बँकेत जमा करावयाची कागदपत्रे
केवायसी डॉक्युमेंट | KYC document |
जागेसबंधित कागदपत्रे | location documents |
एल.ओ.आय. फाइल | L.O.I. file |
तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र | Tahsildar Income certificate |
प्रकल्प अहवाल | Project Report |
उद्योग आधार | Udyog aadhar |
बँकेतून कर्ज घेतल्यानंतर महामंडळाला जमा करावयाची कागदपत्रे
मंजुरी पत्र | Sanction letter |
ईएमआय शेडुल | EMI Schedule |
लोन अकाऊंट स्टेटमेंट | Loan Account Statement |
व्यवसायाचा फोटो | Business photo |
उद्यम आधार | Udyam aadhar |
ज्या खात्यामध्ये व्याज हवे आहे त्या बँकेचा कॅन्सल चेक | Cancelled cheque |
प्रकल्प अहवाल अर्ज | Project Report Application |
कर्ज योजनेसाठी पात्रता निकष Eligibility criteria for Loan Scheme
1. cibil score मेंटेन केलेला असावा.
2. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपयाच्या आत असावे.
3. वयाची मर्यादा 18 ते 60 वर्षापर्यंत वाढवली गेली आहे.